महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे भारतातातील सर्वात मोठ्या पोलीस दलापैकी एक आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे कार्य हे मुंबई पोलीस अधिनियम १९५१ नुसार चालते .महाराष्ट्रात १० पोलीस आयुक्तालये व ८ ग्रामीण परिक्षेत्रे आहेत. राज्याचे पोलीस दल गृहमंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असते .
महाराष्ट्र पोलीस दलाची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे :
- महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे -- २ जानेवारी
- महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग -- गडद निळा
- पोलीस वाहनाच्या दिव्याचा रंग--अंबर
- पोलीस स्मृती दिन-- २१ ऑक्टोबर
- होमगार्डची स्थापना-- १९४६
- पहिले पोलीस आयुक्तालय --मुंबई
- पोलीस आयुक्तालय-- १०
- पोलीस परिक्षेत्रे-- ८
- राज्याचे पहिले पोलीस महासंचालक -- कृष्णकांत मेढेकर (१९८२)
- सध्याचे पोलीस महासंचालक-- सतीश माथूर
- महाराष्ट्र पोलीस दलाचे बोधवाक्य-- '' सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ''
- राज्य पोलीस प्रक्षिशण अकादमी-- नाशिक
१ ) पोलिस भरतीसाठी उमेदवाराची पात्रता :
पोलीस भरतीसाठी उमेदवाराची पात्रता हि सर्वात महत्वाची असते. उमेदवाराने पोलीस भरतीची तयारी सुरु करताना सर्व प्रथम या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे . यामध्ये शैक्षणिक पात्रता महत्वाची असतेच त्याबरोबर उमेदवाराचे वय ,छाती,या बाबी महत्वाच्या असतात.
शैक्षणिक पात्रता :
१२ वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा
वयोमर्यादा
१८ ते २८ पर्यंत. SC/ST साठी + ५ तर OBC साठी + ३ वर्षे सवलत, खेळाडू ५ वर्षे सवलत.
निवड पद्धत
शारीरिक पात्रता चाचणी , कागदपत्रे तपासणी , शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, व वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.
शारीरिक चाचणी:
शारीरिक चाचणीलाच इंग्रजीमध्ये फिझिकल असे म्हणतात. शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांसाठी छाती ,उंची,लांब उडी,पूल अप्स,१६०० मी . धावणे,१००मी धावणे ,गोळा फेक हे घटक असतात . महिला उमेदवांसाठी ८०० मी धावणे,लांब उडी ,गोळा फेक हे घटक असतात
उंची
पुरुष : १६५ सेंमी,महिला : १५५ सेंमीछाती
पुरुष : न फुगवता : ७९ सेंमीफुगवून : ८४ सेमी
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती
शारीरिक क्षमता चाचणी घटक :
अ ) पुरुष उमेदवारांसाठी घटक:
१) 1600 मी. अंतर धावणे.
- ५ मी. १0 से. किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण
५मी. ३0 से. ते ५ मी. ५0 से. – १६ गुण
५ मी. ५0 से. ते ६ मी. १0 से. – १४ गुण
६ मी. १0 से. ते ६ मी. ३0 से. – १२ गुण
६मी. ३0 से. ते ६ मी. ५0 से. – १0 गुण
६मी. ५0 से. ते ७मी. १0 से. – ६ गुण
७ मी. १0 से. ते ७ मी. ३0 से. – 2 गुण
७ मी. ३0 से. किंवा त्यापेक्षा जास्त – 0 गुण
२)100 मी. धावणे
(11.50 सेकंद ) : 20 गुण,
11. 50 से. किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण
11. 50 से. ते 12.50 से. – 18 गुण
12.50 10 से. ते 13.50 से. – 16 गुण
13.50 से. ते 14.50 से. – 14 गुण
14.50 से. ते 15.50 से. – 10 गुण
15.50 से. ते 16.50 से. – 6 गुण
16.50 से. ते 17.50 से. – 2 गुण
17.50 से. पेक्षा जास्त – 0 गुण
३) गोळा फेक
(7.50 किग्रॅ) : 20 गुण ,
8.50 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 20 गुण
7.90 मी. ते 8.50 मी. – 18 गुण
7.30 मी. ते 7.90 मी. – 16 गुण
6.70 मी. ते 7.30 मी. – 14 गुण
6.10 मी. ते 6.70 मी. – 12 गुण
5.50 मी. ते 6.10 मी. – 10 गुण
4.90 मी. ते 5.50 मी. – 8 गुण
4.30 मी. ते 4.90 मी. – 6 गुण
3.70 मी. ते 4.30 मी. – 4 गुण
3.10 मी. ते 3.70 मी. – 2 गुण
3.10 मी. पेक्षा कमी – 0 गुण
४) लांब उडी : 20 गुण,
5 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 20 गुण
4.75 मी. ते 5.00 मी. – 18 गुण
4.50 मी. ते 4.75 मी. – 16 गुण
4.25 मी. ते 4.50 मी. – 14 गुण
4.00 मी. ते 4.25 मी. – 12 गुण
3.50 मी. ते 4 मी. – 9 गुण
3 मी. ते 3.50 मी. – 6 गुण
2.50 मी. ते 3.00 मी. – 3 गुण
2.50 मी. पेक्षा कमी – 00 गुण
५) पूलअप्स : 20 गुण
10 पुलअप्स – 20 गुण
9 पुलअप्स – 16 गुण
8 पुलअप्स – 12 गुण
7 पुलअप्स – 8 गुण
6 पुलअप्स – 4 गुण
5 पुलअप्स – 2 गुण
5 पेक्षा – 0 गुण
ब ) महिला : 800 मी.
१) ८०० मी.
2 मी. 40 से. किंवा त्यापेक्षा कमी – 25 गुण
2 मी. 40 से. ते 2 मी. 50 से. – 22 गुण
2 मी. 50 से. ते 3 मी. – 18 गुण
3 मी. ते 3 मी. 10 से. – 14 गुण
3 मी. 10 से. ते 3 मी. 20 से. – 10 गुण
3 मी. 20 से. ते 3 मी. 30 से. – 6 गुण
3 मी. 30 से. ते 3 मी. 40 से. – 4 गुण
3 मी. 40 से. ते 3 मी. 50 से. – 2 गुण
3 मी. 50 से. किंवा त्यापेक्षा जास्त – 0 गुण
२) 100 मी. धावणे (14 सेकंद ) : 25 गुण,
15 से. – 22 गुण
16 से. – 18 गुण
17 से. – 14 गुण
18 से. – 10 गुण
19 से. – 6 गुण
20 से. – 2 गुण
३) गोळा फेक (4 किग्रॅ) : 25 गुण,
⚫6.00 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 25 गुण
5.50 मी. ते 6.00 मी. – 20 गुण
5.00 मी. ते 5.50 मी. – 15 गुण
4.50 मी. ते 5.00 मी. – 10 गुण
4.00 मी. ते 4.50 मी. – 5 गुण
4 मी. पेक्षा कमी – 0 गुण
४) लांब उडी : 20 गुण,
3.80 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 25 गुण
3.50 मी. ते 3.80 मी. – 21 गुण
3.20 मी. ते 3.50 मी. – 18 गुण
2.90 मी. ते 3.20 मी. – 15 गुण
2.60 मी. ते 2.90 मी. – 12 गुण
2.30 मी. ते 2.60 मी. – 9 गुण
2.00 मी. ते 2.30 मी. – 6 गुण
1.70 मी. ते 2.00 मी. – 3 गुण
1.70 मी. पेक्षा कमी – 00 गुण
लेखी परीक्षा ( १०० गुण)
शारीरिक चाचणी बरोबर लेखी चाचणी देखील पोलीस भरती साठी अत्यंत महत्वाची असते . जे उमेदवार शारीरिक पात्रता चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळून पूर्ण करतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या १: १५ या प्रमाणत प्रवर्गनिहाय उमेदवारांना १०० गुणांच्या लेकी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल.लेखी चाचणीच्या अभ्यासाची काठिण्य पातळी हि m.p.s.c. च्या मानाने अगदी सोपी असते .अगदी ३ ते ४ महिन्यांत सर्व अभ्यास होऊ शकतो. लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समवेश असतो :-
चालू घडामोडी
अंकगणित
सामान्यज्ञान
इतिहास
भूगोल
राज्यशास्त्र बुद्धिमत्ता चाचणी
मराठी व्याकरण
लेखी चाचणीचा कालावधी १ तास ३० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील.
उमेदवारासाठी आवश्यक कागदपत्रे …..
खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स व ओरिजिनल असे दोन्हीही सेट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ३ ते ५ फोटो जवळ बाळगणे आवश्यक आहे.१) शाळा सोडल्याचा दाखला.
२) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रक. उदा:१० व १२ वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
३) जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणीचे वैधता प्रमाणपत्र.
४) प्रकल्पग्रस्त असल्यास त्याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र.
५) अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र
६)सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेले निकष व अटीनुसार उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमिलियर) निकटतम वर्षाचे कालावधीचे प्रमाणपत्र